दहावीत तब्बल २४२ विद्यार्थी शतकवीर!

SSC Result 2020: राज्यात दहावीच्या परीक्षेत तब्बल २४२ विद्यार्थ्यांनी चक्क सेंच्युरी मारली आहे! २४२ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण म्हणजेच १०० टक्के मिळाले आहेत. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ८३,२६३ आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालात भरघोस वाढ झाली आहे. याचाच अर्थ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र केवळ उत्तीर्णतेवरच समाधान न मानता चांगले टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील खूप आहे. निकालातील हे यश शाळांच्या पातळीवर पाहता तब्बल ८,३६० शाळांचा निकाल यंदा १०० टक्के लागला आहे. राज्याचा दहावीचा एकूण निकाल ९५.३० टक्के आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.७७ टक्के असून हा विभाग कमी विद्यार्थी संख्येमुळे सातत्याने अव्वल येण्याची कामगिरी करत आहे. पूर्वी हा विभाग कोल्हापूर विभागात अंतर्भूत होता, तो नंतर स्वतंत्र करण्यात आला. या विभागातील विद्यार्थी संख्या काही हजारांमध्ये असते आणि यशस्वी विद्यार्थ्यांची टक्केवारीही अधिक असते. मुलींची बाजी यावर्षी दहावीला १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींनी यंदाही बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९१ आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.९० टक्के आहे. उत्तीर्ण विद्यार्थी - ७ लाख ८९ हजार ३०९ उत्तीर्ण विद्यार्थिनी - ७ लाख ११ हजार ७१६ पुढीलपैकी कोणत्याही एका वेबसाइटवर निकाल पाहू शकाल -


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gavGi8
via IFTTT

Post a Comment

0 Comments