Also visit www.atgnews.com
बारावी निकाल: 'अशी' करा गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन
बारावी निकालानंतर गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाकित प्रती, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्र या चार प्रक्रिया यावर्षी करोनामुळे प्रथमच ऑनलाइन होणार आहे. यासाठी एक संकेतस्थळ देखील राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने सुरू केले आहे. या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून ऑनलाइन पद्धतीनेच शुल्कही भरायचे आहे. ऑनलाइन गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढीलप्रमाणे - https://ift.tt/32lYvUG अर्ज कसे भरायचे त्यासंबंधीच्या सूचना वरील लिंकवर दिसणार आहेत. या अर्जांसाठी शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरायचे आहे, अशी माहिती मंडळाने दिली आहे. महत्त्वाच्या तारखा - गुणपडताळणीसाठी अर्ज - १७ जुलै २०२० ते २७ जुलै २०२० छायाप्रतीसाठी अर्ज - १७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० कोविड - १९ विषाणूच्या संसर्गामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पूर्ण किंवा अंशत: लॉकडाऊन स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी-पालकांना मंडळाच्या कार्यालयापर्यंत यावे लागू नये म्हणून ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि स्थलांतर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. केवळ ऑनलाइन पद्धतीनेच केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38ZNKsB
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments