कॅट २०२० परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

CAT 2020: कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२० चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) २९ नोव्हेंबर २०२० रोजी कॅट परीक्षेचे आयोजन करणार आहे. देशातील २० IIM मधील MBA / PGDM अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. iimcat.ac.in या परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर शेड्युल देण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर आहे. कॅट परीक्षेचे अॅडमिट कार्ड २८ ऑक्टोबरपासून परीक्षेच्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येईल. वेळापत्रकानुसार कॅट परीक्षेचा निकाल जानेवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. कॅट परीक्षेचे आयोजन कोविड -१९ महामारी लक्षात घेऊन त्यानुसार केलं जाईल. परीक्षेच्या संकेतस्थळावर दिलेल्या सूचना या केंद्र व राज्य सरकार आणि कॅट समूहाद्वारे वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार बदलूही शकतात. त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे - नोंदणी सुरू होण्याची तारीख- ५ ऑगस्ट २०२० (सकाळी १० वाजता) नोंदणीची अखेरची मुदत - १६ सप्टेंबर २०२० (सायंकाळी ५ वाजता) अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख- २८ ऑक्टोबर २०२० कॅट परीक्षेची तारीख- २९ नोव्हेंबर २०२० परीक्षेचा निकाल - जानेवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hKWrKq
via IFTTT

Post a Comment

0 Comments