SSC Result 2020: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे. राज्यातील ८,३६० शाळांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. एकूण १७ लाख ९ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी निकाल सटकून आपटला होता. २००६ सालानंतरचा तो सर्वाधिक कमी निकाल होता. नवा अभ्यासक्रम हे त्यामागचं कारण मानलं जात होतं. गेल्या दोन-तीन वर्षात अंतर्गत मूल्यमापनही झालं नव्हतं. यंदा मात्र निकालाने उसळी घेतली. गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. दृष्टिक्षेपात निकाल - परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी - १७ लाख ६५ हजार ८९८ परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी - १७ लाख ९ हजार २६४ एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - १५ लाख १ हजार १०५ एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी - ९५.३० टक्के विभागनिहाय टक्केवारी कोकण - ९८.७७ टक्के पुणे- ९७.३४ टक्के कोल्हापूर -९७.६४ टक्के अमरावती - ९५.१४ टक्के नागपूर - ९३.८४ टक्के मुंबई- ९६.७२ टक्के लातूर - ९३.०७टक्के नाशिक - ९३.७३ टक्के औरंगाबाद - ९२ टक्के निकालाची वैशिष्ट्ये - - कोकण विभाग अव्वल ९८.७७ टक्के - औरंगाबाद सर्वात कमी ९२ टक्के - गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ - राज्यातील २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण कुठे पाहाल निकाल? पुढीलपैकी कोणत्याही एका वेबसाइटवर निकाल पाहू शकाल - या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. गुणपडताळणी / छायाप्रती / पुनर्मूल्यांकन ऑनलाइन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना श्रेणीव्यतिरिक्त कोणत्याही अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी-पालकांना https://ift.tt/2DB6WB5 या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळेमार्फत अर्ज करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक अटी व सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत. या प्रक्रियांसाठी शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. महत्त्वाच्या तारखा - गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत - ३० जुलै २०२० ते ८ ऑगस्ट २०२० छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत - ३० जुलै २०२० ते १८ ऑगस्ट २०२०


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2X4riK7
via IFTTT