'स्टडी इन इंडिया' साठी केंद्र सरकारची समिती

करोना विषाणू महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मोठा दुष्परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला आहे. परदेशी शिक्षणाची दारे तूर्त तरी बंद झाली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक समिती नेमली आहे. देशातील विद्यार्थी देशातच चांगल्या प्रकारे शिक्षण कशी घेतील आणि परदेशातून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांची येथील शिक्षणाची प्रक्रिया कशी सुरळीत होईल याबाबत मार्गदर्शन करून शिफारशी सुचविण्याचं काम ही समितीत करणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) चे अध्यक्ष या समितीचे नेतृत्व करणार आहेत. देशातील चांगल्या विद्यापीठांमधील इनटेक वाढवण्यासाठी देखील ही समिती शिफारस करणार आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री यांनी दिली. पोखरियाल यांनी 'स्टे इन इंडिया आणि स्टडी इन इंडिया' या विषयावर बैठक घेतली. अनेक वरिष्ठ अधिकारी, स्वायत्त तसेच तंत्र शिक्षण संस्थांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची स्वप्न पाहणारे विद्यार्थी आणि कोविड - १९ मुळे परदेशातून भारतात परतणारे विद्यार्थी यांच्या गरजा यावेळी बैठकीत मांडण्यात आल्या. पोखरियाल म्हणाले, 'कोविड - १९ मुळे अनेक विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षणासाठी जाण्याऐवजी देशातच शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशातून भारतात माघारी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील खूप मोठी आहे. या विद्यार्थ्यांना त्यांची उर्वरित शिक्षण पूर्ण करण्याची चिंता आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या समस्यांची सोडवणून करण्यासाठी मंत्रालयाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.' पोखरियाल यांनी माहिती दिली की २०१९ मध्ये सुमारे साडेसात लाख विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी गेले होते. सरकारने सर्व टॉप शैक्षणिक संस्थांमधील इनटेक २०२४ पर्यंत ५० टक्के वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच शैक्षणिक संस्थांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. विविध मल्टी-डिसिप्लिनरी अभ्यासक्रम सुरु करणे, जॉइंट डिग्री अभ्यासक्रम सुरू करणे, परदेशातील सर्वोत्तम शिक्षकांद्वारे ऑनलाइन लेक्चर्स आयोजित करणे, उद्योग आणि शिक्षणाची नाळ जोडणे, भारतीय उच्च शिक्षण संस्थांमध्ये उद्योगांना वाव देणे अशा विविध उपक्रमांसाठी कशा पद्धतीची यंत्रणा राबवावी लागेल याचा अभ्यास ही समिती करणार आहे. येत्या १५ दिवसात समिती अहवाल देणं अपेक्षित आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3012q7Y
via IFTTT

Post a Comment

0 Comments