बारावीच्या हुशार विद्यार्थ्यांना मिळणार लॅपटॉप

मध्य प्रदेश बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जाणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केली. ही योजना पुन्हा सुरू केली जात आहे. विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत लॅपटॉप खरेदीसाठी २५ हजार रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती चौहान यांनी ट्विटद्वारे दिली. मध्य प्रदेश राज्य मंडळाचा बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जाणार आहेत. अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी 'रुक जाना नहीं' जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी मध्य प्रदेश सरकारने रुक जाना नहीं ही योजना सुरु केली आहे. याअंतर्गत दहावी आणि बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना याचवर्षी पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी दिली जाणार आहे. ही फेरपरीक्षा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देता येणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने ही योजना यापूर्वीच सुरू केली आहे. राज्य मंडळाची दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेतली जाते. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jDmzst
via IFTTT

Post a Comment

0 Comments