पदवी परीक्षा घरात बसून देता येणार! 'या' राज्याने घेतला निर्णय

मध्य प्रदेशात ग्रॅज्युएशन (UG) आणि पोस्ट ग्रॅज्युएशन (PG) च्या अंतिम वर्षाच्या परीक्षा यूजीसीच्या गाईडलाइन्सनुसार सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली की परीक्षा आयोजित केल्यानंतर निकाल ऑक्टोबर महिन्यात जारी केला जाईल. विशेष म्हणजे या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना कोठेही जावे लागणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरीच राहून सुरक्षितपणे परीक्षा देता येणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी घोषणा केली. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा विद्यार्थी आपल्या घरूनच देऊ शकतील. उत्तरपत्रिका त्यांनी आपल्या जवळच्या कलेक्शन सेंटरवर जमा करायच्या आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, पदवीच्या अखेरच्या सत्रातील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठवली जाईल. विद्यार्थ्यांनी आपल्या घरूनच पेपर सोडवायचा आहे. उत्तरपत्रिका नंतर राज्य सरकारद्वारे ठरवून दिलेल्या संकलन केंद्रावर सबमिट करायच्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केले की पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या परीक्षेतील गुण आणि या वर्षीचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण याआधारे प्रमोट केले जाणार आहे. करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jMxe46
via IFTTT

Post a Comment

0 Comments