दहावीच्या निकालाच्या तारखेची घोषणा लवकरच

ssc result 2020: राज्य मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल कधी जाहीर होणार असे प्रश्न विद्यार्थी-पालकांकडून सोशल मीडियावर विचारले जात आहेत. विद्यार्थी-पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे, असे स्वत: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच प्रसारमाध्यमांसमोर बोलताना जाहीर केले होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख येत्या दोन दिवसांत ठरण्याची शक्यता आहे. जुलै अखेरपर्यंत निकाल जाहीर होईल, अशी माहिती मंडळातील सूत्रांनी दिली. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. या परीक्षेला राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. संपुर्ण राज्यात परीक्षेसाठी ४ हजार ९७९ परीक्षा केंद्रे आहेत. एकूण २२ हजार ५८६ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नांेदणी झाली आहे. भूगोलाचा पेपर झाला होता रद्द भूगोल विषयाची परीक्षा २३ मार्च २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नियोजित होती; मात्र ती करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना या विषयात सरासरी गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. बोर्डाच्या परिपत्रकानुसार, सामाजिक शास्त्रे पेपर - २ या विषयाचे गुणदान हे सरासरीने होणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेत त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी लक्षात घेऊन त्याचे गुणांत रुपांतर करून त्यानुसार गुण दिले जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/302AsZo
via IFTTT

Post a Comment

0 Comments