महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल उद्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी २९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. बुधवारी २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच निकालाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल तसेच निकालाची प्रिंटही घेता येईल. पुढील संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल - https://ift.tt/3f4tkA4 www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. ऑनलाइन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना श्रेणीव्यतिरिक्त कोणत्याही अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी-पालकांना https://ift.tt/2DB6WB5 या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळेमार्फत अर्ज करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक अटी व सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत. या प्रक्रियांसाठी शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. महत्त्वाच्या तारखा - गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत - ३० जुलै २०२० ते ८ ऑगस्ट २०२०छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत - ३० जुलै २०२० ते १८ ऑगस्ट २०२०श्रेणीसुधार योजना मार्च २०२० परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन संधी श्रेणी / गुणसुधार योजनेसाठी उपलब्ध राहतील. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना आपला निकाल सुधारायचा असेल ते विद्यार्थी लगतच्या दोन परीक्षा देऊन आपली टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करू शकतील. या परीक्षेला राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. संपूर्ण राज्यात परीक्षेसाठी ४ हजार ९७९ परीक्षा केंद्रे होती. एकूण २२ हजार ५८६ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नांेदणी झाली होती. राज्यात दि. ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा पार पडली. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ मुले व ७ लाख ८९ हजार ८९४ मुली आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण ९ हजार ४५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते. भूगोलाचा पेपर झाला होता रद्द भूगोल विषयाची परीक्षा २३ मार्च २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नियोजित होती; मात्र ती करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना या विषयात सरासरी गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. बोर्डाच्या परिपत्रकानुसार, सामाजिक शास्त्रे पेपर - २ या विषयाचे गुणदान हे सरासरीने होणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेत त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी लक्षात घेऊन त्याचे गुणांत रुपांतर करून त्यानुसार गुण दिले जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30WU803
via IFTTT

Post a Comment

0 Comments