Also visit www.atgnews.com
शालेय विद्यार्थिनींची कमाल! शोधला नवा लघुग्रह, नासाचा दुजोरा
सूरत: गुजरातमधील सूरत शहरातील एका महाविद्यालयात शिकत असलेल्या दोन विद्यार्थिनींनी अंतरिक्षात एक लघुग्रह () शोधून काढण्याची कमाल केली आहे. नासाने () या शोधाला दुजोरा दिला आहे हे विशेष. या नव्या लघुग्रहाचे नाव असे देण्यात आले आहे. १४ वर्षीय वैदेही बेकारिया आणि राधिका लखानी अशी या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत. वैदेही आणि राधिका या पीपी सावनी चैतन्य विद्या संकुलात शिकतात. या दोघी अतरिक्षात संशोधन करणाऱ्या नासाशी संबंधित अखिल भारतीय लघुग्रह शोध मोहिमेशी () संबधित आहेत. या दोन विद्यार्थिनींनी आपल्या खगोलीय अभ्यासाचे प्रशिक्षण SPACE संस्थेत घेतले होते. नासाने ई-मेल द्वारे या शोधाला दुजोरा दिला आहे. IASC चे संचालक डॉक्टर पॅट्रित मिलर यांनी संस्थेला हा ई-मेल पाठवला आहे. गेल्यावेळच्या अभियानात आपण HLV2514 या नव्या लघुग्रहाबाबत आम्हाला कळवले होते. हा लघुग्रह मंगळ ग्रहाच्या जवळ आहे. काही दिवसांमध्ये तो पृथ्वीला देखील पार करणार आहे. तुमचे अभिनंदन असे मिलर यांनी ई-मेलमध्ये लिहिले आहे. लघु ग्रहाला नाव देण्याची मिळणार संधी वैदेही ही विद्यार्थिनी भावनगर जिल्हायातील रहिवासी आहे. तर राधिका ही अमरेली जिल्ह्यातील आहे. आम्ही अंतरिक्षात सुमारे २० पदार्थांना चिन्हित केले होते. त्यांपैकी हा एक लकी निघाला. सध्या आम्ही या लघुग्रहाला तात्पुरते नाव दिले आहे. त्याचे परिवलन पूर्ण झाल्यानंतर या लघुग्रहाला नाव देण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. यासाठी काही वर्षांचा कालावधी जावा लागणार आहे, असे टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना वैदेही आणि राधिकाने सांगितले. वाचा: भारतात तब्बल ४ वर्षांनी शोधला गेला नवा लघुग्रह गुजरातमध्ये पहिल्यांदाच आणि देशात चार वर्षांनंतर नवा लघुग्रह शोधून काढण्यात आहे, असे SPACE ते एज्युकेटर आकाश द्विवेदी यांनी म्हटले आहे. करोनाच्या या संकट काळात या कार्यक्रमात भाग घेऊन प्रशिक्षण घेण्याची ही प्रक्रिया घरूनच ऑनलाइन पूर्ण करण्यात आल्याचेही ते म्हणाले. वाचा: वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fZ8J1c
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments