Also visit www.atgnews.com
पदवी परीक्षा: UGC ला गाइडलाइन्स बदलण्याचा अधिकार- सर्वोच्च न्यायालय
Final Year Exams 2020: देशातील विद्यापीठांच्या अंतिम वर्ष परीक्षांबाबतची सुनावणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात झाली. याचिकाकर्त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाला सांगितले की एप्रिलमध्ये जारी केलेल्या गाईडलाइन्स यूजीसीने जुलैमध्ये बदलल्या आणि अधिक कठोर केल्या. यावर कोर्टाचं असं म्हणणं पडलं की गाइडलाइन्स बदलण्याचा अधिकार यूजीसीला आहे. अंतिम वर्ष परीक्षा विद्यापीठांनी सप्टेंबर अखेरपर्यंत घ्याव्यात या यूजीसीच्या निर्देशांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर ही सुनावणी सुरू आहे. यापुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे. सिंघवी म्हणाले, 'देशात अशी अनेक विद्यापीठे आहेत, जेथे ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा नाहीत.' सिंघवी यांच्या या युक्तीवादावर कोर्टाने म्हटले की परीक्षा ऑफलाइन देणअयाचा पर्याय देखील गाइडलाइन्समध्ये आहे. यावरल सिंघवी म्हणाले, 'अनेक लोक स्थानिक महामारीच्या स्थितीमुळे ऑफलाइन परीक्षा देऊ शकणार नाहीत. त्यांना नंतर परीक्षा देण्याचा पर्याय आणखी गोंधळ निर्माण करेल.' यावर कोर्ट म्हणाले की हा निर्णय विद्यार्थी हिताचा दिसत आहे. यापुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) गुरुवारी ३० जुलै रोजी सुप्रीम कोर्टात आपलं म्हणणं मांडलं होतं. यात 'अंतिम वर्ष परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्याचा हेतू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भवितव्य जपणं हा आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील वर्षी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येणार नाही.' यूजीसीने आपल्या उत्तरात याचिकाकर्ते आणि विविध राज्य सरकारला संबोधित केले होते. कोर्टाने सर्व संबंधित याचिका रद्द कराव्यात अशी मागणीही यूजीसीने केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XdwdYW
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments