Also visit www.atgnews.com
जेईई-नीट: १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांचं पंतप्रधान मोदींना पत्र
देशातील आणि परदेशातील विविध विद्यापीठातून सुमारे १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेईई-नीट परीक्षांसंदर्भात पत्र लिहिले आहे. नीट आणि जेईई परीक्षांना आणखी विलंब झाला तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होईल, अशी चिंता या शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या परीक्षांना देशभरात विविध राजकीय पक्षांकडून विरोध होतो आहे. काही राज्यांचाही या परीक्षा कोविड-१९ काळात घेण्याला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर या पत्रात असं म्हटलंय की, 'काही जण स्वत:चे राजकीय हित साधण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत.' 'तरुण आणि विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. कोविड-१९ महामारीमुळे त्यांच्या करिअरवरही संकटाचे ढग आहेत. प्रवेश, वर्ग याबाबतच्या सर्व समस्या लवकरात लवकर दूर व्हायला हव्यात,' असं या पत्रात म्हटलं आहे. दरवर्षीप्रमाणे, यंदाही लाखो विद्यार्थी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, आणि आता पुढे काय होणार याची वाट पाहत घरी बसले आहेत, असंही यात लिहिलं आहे. जेईई मेन आणि नीट परीक्षा आयोजित करण्याचे सरकारने ठरवले आहे. मात्र यात आणखी विलंब झाला तर विद्यार्थ्यांचे मौल्यवान वर्ष वाया जाईल. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी कोणत्याही किमतीवर तडजोड केली जाऊ नये, असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे. मेडिकल आणि इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमांसाठी देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांना अनेक राज्यांमध्ये विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिण्यात आले आहे. जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर तर नीट परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Qv3Bqo
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments