न्यायालयाच्या निकालाचा आदर करून परीक्षांबाबत पुढील निर्णय: उदय सामंत

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतच महाराष्ट्र सरकारला घ्यावा लागेल. मात्र त्या आदेशाचं पालन करत असताना एकाही विद्यार्थ्याला कोविड-१९ बाधा होऊ नये यासाठी खबरदारी घेऊन परीक्षा घेण्याबाबत काय फॉर्म्युला आणायचा याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. मी स्वत: कुलगुरूंची भेट घेणार आहे आणि करोना परिस्थितीत काय खबरदारी घेता येईल त्याचा आढावा घेणार आहे. विद्यार्थ्यांची बाजू मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्यातील पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताची बाजू आम्ही प्रामाणिकपणे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडली, याचे आम्हाला समाधान आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. विद्यापीठ अनुदान आयोगाला राज्यातील करोना स्थितीबाबत यापूर्वीही कळवले होते. न्यायालयातही प्रतिज्ञापत्र सादर केले होते. राजकारण करायचे नाही 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षांनी टीका टिप्पणी करायला सुरूवात केली आहे. सरकार आडवे पडले, उताणी पडले अशा प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे दिल्या जात आहेत. या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचं खच्चीकरण करणाऱ्या आहेत. अशा पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांना मला उत्तर द्यायचे नाही. त्यांनाच त्यांच्या अशा वागणुकीचं उत्तर भविष्यात मिळेल,' असे उदय सामंत म्हणाले. सर्वोच्च न्यायायलाने काय दिला निकाल? पदवी परीक्षा नको म्हणणाऱ्या विद्यार्थी-पालकांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळालेला नाही. राज्य परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड काळात परीक्षा घेणे शक्य नाही ते यूजीसीकडे परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करू शकतात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने एखाद्या राज्यात दिलेले परीक्षा रद्द करण्याचे निर्देश यूजीसीच्या निर्देशांपेक्षा अधिक असू शकतात, मात्र विद्यार्थ्यांना पदवीशिवाय उत्तीर्ण करण्याचे निर्देश आपत्कालिन व्यवस्थापन कायद्याच्या कक्षेबाहेरचे आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3b8uH03
via IFTTT

Post a Comment

0 Comments