एम्स पीजी फायनल परीक्षा २०२० चा निकाल जाहीर

PG result 2020: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पदव्युत्तर पदवी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. एम्सच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी एम्स पीजी अंतिम परीक्षा दिली आहे, त्यांनी aiimsexams.org या एम्सच्या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि आपला निकाल पाहावा. निकाल डाऊनलोडही करता येणार आहे. एम्स पीजी अंतिम परीक्षा ऑगस्ट महिन्यातच घेण्यात आली होती. AIIMS PG result 2020 कसा पाहाल? पुढे दिलेल्या स्टेप बाय स्टेप पद्धतीने एम्स पीजी फायनल निकाल पाहता येईल - १) एम्सचे अधिकृत संकेतस्थळ aiimsexams.org वर जा. २) होमपेजवर Result: Final Post-Graduate Programme Professional Examination held in August,2020 या पर्यायावर क्लिक करा. ३) आता एक नवे पेज उघडेल. ४) कंट्रोल + एफ (Ctrl + F) बटण दाबून तुमचं नाव आणि रोल नंबर द्या. ५) आता स्क्रीनवर तुमचा दिसेल. ६) हा निकाल डाऊनलोड करता येईल आणि भविष्यातील संदर्भासाठी या निकालाची तुम्ही प्रतही घेऊ शकता. पुढील थेट लिंकद्वारे देखील उमेदवार एम्स पीजीचा निकाल पाहू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aYc27e
via IFTTT

Post a Comment

0 Comments