अमेरिकेत कॉलेजं उघडली; करोनाग्रस्त वाढले

कोविड -१९ संसर्ग स्थितीमुळे जगभरातील शाळा-महाविद्यालये अद्याप बंद आहेत. मात्र काही देशांमध्ये महाविद्यालये उघडण्याबाबतचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनांनी घेतला आणि याचे दुष्परिणाम अवघ्या काही दिवसांतच दिसून आले. अलाबामा युनिव्हर्सिटीच्या ५५० विद्यार्थ्यांना कोविड - १९ ची लागण झाल्याचे सोमवारी आढळून आले. विद्यापीठाने १९ ऑगस्टपासून प्रत्यक्ष वर्ग भरवण्यास सुरूवात केली आहे. विद्यापीठाचे टुस्कालुसा येथील मुख्य कॅम्पसमधील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. या कॅम्पसमध्ये अचानक वाढलेली करोना रुग्णांची संख्या पाहून टुस्कालुकाच्या मेयरनी सोमवारी आदेश जारी करत पुन्हा १४ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. 'जे विद्यार्थी कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी स्वत:च्या घरी जाऊन आयसोलेट होणे पसंत केले आहे,' असी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू केली रिनहर्ट यांनी रॉयटर्सला दिली. विद्यापीठाने ४६ हजार चाचण्या केल्या. यापैकी १ टक्के विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात विद्यापीठाचे वर्ग सुरू झाले. त्यासाठी विदयापीठात परतलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४०० जणांनाही करोनाची लागण झाली आहे. केवळ अलाबामाच नाही तर सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातही हीच परिस्थिती आहे. या विद्यापीठाच्या लॉस एंजेलिसमधील युनिव्हर्सिटी पार्क कॅम्पसमध्ये १०० हून अधिक विद्यार्थी पॉझिटिव्ह आहेत. ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीतदेखील मंगळवारपासून वर्ग सुरू झाले आणि विद्यार्थ्यांनी आरोग्य आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने केसेस वाढल्या. गेल्या आठवड्यात नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाने गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे कोविड केसेस वाढल्याने सुरू केलेले वर्ग बंद केले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gxrnN2
via IFTTT

Post a Comment

0 Comments