पदवी परीक्षा निकाल: 'अशैक्षणिक निर्णयाचा पराभव'

सर्वोच्च न्यायालयाने पदवी परीक्षांसंदर्भात दिलेल्या निकालावर विविध विद्यार्थी संघटनांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. केंद्रीय विद्यापीठे व IIT मध्ये परीक्षा न होता डिग्री देण्यात आली, मग राज्य विद्यापीठांना परीक्षा घेण्यास सांगणारे सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, अशी प्रतिक्रिया प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड.. मनोज टेकडे यांनी व्यक्त केली. याचिकाकर्त्यांपैकी एक पुणे येथील धनंजय कुलकर्णी यांनी तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निर्णयाचे स्वागत केले. अशैक्षणिक निर्णयाचा पराभव 'याचिककर्ता म्हणून आमची अशी भूमिका होती की परीक्षेशिवाय पदवी देणं हे अशैक्षणिक आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा व्हायला हव्यात. कोविडमुळे त्या पुढे ढकलल्या तरी परीक्षेशिवाय पदवी हे अशैक्षणिक आहे. अशा अशैक्षणिक निर्णयाचा आज पराभव झाला. हा अशैक्षणिक निर्णय घेऊन जे राजकारण करत होते त्यांचाही पराभव झाला,' असं कुलकर्णी म्हणाले. विद्यार्थ्यांना धक्का देणारा निर्णय 'करोना आजार पसरू नये या साठी केंद्र सरकारने सुरवाती पासून घोळ घातला हे संपूर्ण देशाने पहिला आहे, केंद्रीय विद्यापीठे व IIT मधे सरासरी गुण कडून पदवी परीक्षांचा निकाल देण्यात आला त्यांनी ऑनलाइन पद्धतीने पदवी समारंभ देखील घेऊन टाकला, भारतातील सर्वात उच्च दर्जा म्हणून प्रसिद्ध असणारी विद्यापीठे निर्णय घेऊन मोकळी झाली, असे असताना केवळ केंद्र सरकारच्या दबावाखाली सुप्रीम कोर्ट असल्याने त्यांनी राज्य सरकारने रद्द केली परीक्षा घ्याव्यात हा विद्यार्थ्यांना धक्का देणारा निर्णय दिला आहे,' असे अॅड. अजय तापकीर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. निर्णयाचं स्वागत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व राज्य सरकारच्या चुकीच्या परीक्षा धोरणामुळेच विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला. सुप्रीम कोर्टाने शिक्षणाची गुणवत्ता कायम राखत तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत, परीक्षा घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं अभाविप स्वागत करते. 'कोविड–१९' आलेल्या संकटाशी लढा देताना शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या समस्यांचा नव्या संधींचा सकारात्मक दृष्टिने विचार करण्याची आज आवश्यकता होती. आदित्य ठाकरे व राज्य सरकार यांच्या परीक्षा न घेण्याच्या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थीला वर्गाला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले, परंतु आज सुप्रीम कोर्टाच्या निकालाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य हितासोबतच गुणवत्तेलाही वाव देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्या दबावाला बळी न पडता राज्य सरकारने त्यात राजकरण करता परीक्षा / मूल्यांकन होऊ द्यावे तसेच विद्यार्थ्यांचं आरोग्य हित जपत सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत योग्य त्यावेळेत विद्यापीठानी विद्यार्थ्यांच्या परीक्षा / मूल्यांकन विविध पर्यायांमार्फत करावे. यासाठी अभाविप स्थानिक प्रशासना सोबत राहील असे महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी यावेळी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34NZnT4
via IFTTT

Post a Comment

0 Comments