नवीन शिक्षण धोरणासंबंधी शिक्षणमंत्र्यांना विचारा थेट प्रश्न

NEP 2020: देशात तब्बल ३४ वर्षांनंतर नवे शिक्षण धोरण जाहीर करण्यात आले आहे. या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाबद्दल कोणाला काही प्रश्न, शंका असतील तर त्या थेट केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांना विचारण्याची संधी चालून आली आहे. अर्थात शिक्षणमंत्री या प्रश्नांना उत्तरे कधी देणार त्याची वेळ अजून जाहीर करण्यात आलेली नाही, पण प्रश्न मात्र पाठवता येणार आहेत. या प्रश्नांच्या उत्तरासाठी एक संपूर्ण दिवस राखून ठेवण्यात येणार असल्याचे पोखरियाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहे. ज्यांना नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणासंबंधी प्रश्न विचारायचे आहेत, त्यांनी #NEPTranformingIndia हा हॅशटॅग वापरून आपले प्रश्न पाठवायचे आहेत. पोखरियाल यांच्या तसेच मंत्रालयाच्या ट्विटर किंवा फेसबुकवर हँडलवर हे प्रश्न पाठवता येतील. शालेय आराखडा १० + २ ऐवजी ५ + ३ + ३ + ४ करणे, बोर्ड परीक्षांचं महत्त्व कमी करणे, मूल्यांकन पद्धतीत बदल करणे, पाचवीपर्यंत मातृभाषेत शिकवणे, सर्व महाविद्यालयांच्या प्रवेशांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेणे, लवचिक अभ्यासक्रम, उच्च शिक्षणासाठी एकच शिखर संस्था आदी या नव्या शिक्षण धोरणाची वैशिष्ट्ये आहेत. मनुष्यबळ मंत्रालय आता शिक्षण मंत्रालय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणजेच शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. हा नावात बदल नव्या केंद्रीय शिक्षण धोरणातीलच एक भाग आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/325cPPA
via IFTTT

Post a Comment

0 Comments