CLAT 2020: लॉ प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर

कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजने सोमवारी कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT 2020) ची तारीख जाहीर केली. परीक्षा ७ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. त्यात कोविड - १९ महामारी काळात परीक्षा घेताना काय खबरदारीचे उपाय अवलंबता येतील त्यांचा आढावा घेण्यात आला आणि क्लॅटची तारीख ठरवण्यात आली. देशात विविध ठिकाणी असलेल्या लॉकडाऊन स्थितीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. आरोग्य आणि सुरक्षिततेचे सर्व आवश्यक प्रोटोकॉल पाळून परीक्षा घेण्यात येण्यावर एकमत झाले. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, यूजी आणि पीजी विद्यार्थ्यांसाठी ७ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा संगणकीकृत असणार आहे. परीक्षा केंद्रांवर ती होईल. कन्सोर्टियम परीक्षा केंद्रांची पाहणी करणार आहे. विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षा दिली जाईल. विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड हेच त्यांचे वाहतुकीचे परवाने समजले जावेत यादृष्टीने आवश्यक त्या परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया कन्सोर्टियम पार पाडत आहे. विशेषत: कंटेन्मेंट झोनमधून प्रवास करताना विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही यासाठी स्थानिक पातळीवरील यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे. अॅडमिट कार्ड (हॉलतिकिट) विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांनंतर संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे. कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33LKmAK
via IFTTT

Post a Comment

0 Comments