सीएस परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना ICSI चा मदतीचा हात

CSEET 2020: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ICSI) ने गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. स्टुडंट्स एज्युकेशन फंड ट्रस्ट द्वारे अशा हुशार पण आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च करणार आहे. ही मदत मिळवण्यासाठी संस्थेने निकषही तयार केले आहेत. इच्छुक आणि योग्य विद्यार्थ्या यासाठी अर्ज करून मदत मिळवू शकतात. कोणते विद्यार्थी करू शकतील अर्ज? या योजनेचं उदि्दष्ट गरीब विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हे आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ते विद्यार्थी अर्ज करू शकतील. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३ लाखांहून कमी आणि त्या विद्यार्थ्याला बारावीत ६५ टक्के किंवा अधिक आणि पदवीला ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत, असे विद्यार्थी अर्ज करू शकतील. याव्यतिरिक्त असे विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतील, ज्यांना बारावीत ८५ टक्के किंवा पदवीला ७० टक्के आहेत पण ज्यांची परिस्थितीत खूप वाईट नसली तरी बेताची आहे. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'या योजनेतील गाइडलाइन्सअंतर्गत योग्य विद्यार्थ्यांना CSEET (Company Secretary Executive Entrance Test) साठी जमा केलेले नोंदणी शुल्क परत केले जाईल. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच हा शुल्क परतावा मिळेल.' जर विद्यार्थी एक्झिक्युटिव्ह कोर्सला प्रवेश घेणार असतील तर नंतर त्यांचे उर्वरित शुल्कदेखील परत केले जाईल. ICSI च्या स्टुडंट्स एज्युकेशन फंड ट्रस्टची सुरुवात अशा विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी करण्यात आली आहे, ज्यांना करायचा आहे, जे हुशार आहेत, पण आर्थिक दृष्ट्या त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूटच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. परीक्षा २९ ऑगस्टला आहे. घरबसल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34FDlCd
via IFTTT

Post a Comment

0 Comments