Also visit www.atgnews.com
IIT प्रवेशांसाठी समुपदेशन नोंदणी ६ ऑक्टोबर पासून
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIITs), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs) आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट (GFTIs) मधील बीटेक प्रवेशांसाठी जॉइंट सीट अॅलोकेशन ऑथोरिटी () समुपदेशन नोंदणी सुरु करणार आहे. काउन्सेलिंगसाठी ६ ऑक्टोबर पासून नोंदणी सुरू केली जाणार आहे. JoSSA चे हे काउन्सेलिंग शेड्युल अद्याप अंतिम स्वरुप देण्यात आलेले नाही. मात्र, जेईई अॅडव्हान्स्डच्या माहिती पुस्तिकेत तात्पुरते वेळापत्रक देण्यात आलेले आहे. JoSSA काऊन्सेलिंगसाठी विद्यार्थ्यांना त्यांचे पसंतीक्रम नोंदवायचे आहेत. जागावाटप सात राउंडमध्ये होणार आहे. जेईई मेन २०२० मध्ये पात्र ठरल्यावर उमेदवार आयआयआयटी, एआयटी आणि जीएफटीआयमधील प्रवेशांसाठी पात्र ठरू शकतील. जेईई मेन परीक्षेतील पहिले २ लाख ५० हजार रँकहोल्डर्स जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरतील. जे उमेदवार जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण होतील ते आयआयटींमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी पात्र ठरतील. जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, जेईई अॅडव्हान्स्ड २०२० परीक्षेसाठी ११ सप्टेंबर पासून नोंदणी सुरू होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jjJEzg
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments