JEE Main परीक्षार्थींना मोठा दिलासा; रेल्वे प्रवासाची मुभा

: मंगळवार १ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या प्रवेश परीक्षेसाठी मुंबई तसेच उपनगरातील विद्यार्थ्यांसमोर प्रवास कसा करायचा हा मोठा प्रश्न होता. यावर आता मध्य व पश्चिम रेल्वेने तोडगा काढला असून या विद्यार्थ्यांना उनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र पाहून विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार तसेच पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी संयुक्त प्रसिद्ध पत्रकात स्पष्ट केले आहे. यामुळे मुंबईतील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. जेईईची परीक्षा १ सप्टेंबरपासून सुरू होणार असून ती ६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे, तर १३ सप्टेंबर रोजी नीटची परीक्षा होणार आहे या दिवशीही विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार आहे. जेईई आणि नीट या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने रल्वे मंडळाच्या अध्यक्षांना पत्र लिहेले होते. यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. जेईई (मेन)च्या परीक्षेला देशभरातून ९ लाख ५३ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ही परीक्षा देशभरात ६६० परीक्षा केंद्रावर होणार आहे. तर राज्यात या परीक्षेला १ लाख १० हजार ३१३ विद्यार्थी बसणार असून ही परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर या कोरोनाचा कहर सुरू असलेल्या प्रमुख शहरांतील ७४ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. दरम्यान, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी केली होती. 'नीट आणि जेईई मेन २०२० च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हॉ़ल तिकिटावर उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती आपण रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे,' असे ट्विट शेलार यांनी केले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31HFHOU
via IFTTT

Post a Comment

0 Comments