Also visit www.atgnews.com
UPSCत यंदा १४० हून अधिक अल्पसंख्याक उमेदवार यशस्वी
UPSC Civil Service Exams 2019: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यंदा अल्पसंख्याक समुदायातील १४० हून अधिक तरुणांनी यश मिळवले आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. केंद्र सरकारने 'नयी उडान' ही योजना सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर तरुणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. नयी उडान योजनेच्या माध्यमातून केंद्रीय सिव्हील सर्व्हिस परीक्षेत यश मिळवलेल्या उमेदवारांचा सन्मान करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात नकवी बोलत होते. नकवी म्हणाले, 'गेली तीन वर्षे सातत्याने अल्पसंख्याक समुदायातील सुमारे १५० युवक-युवती नागरी सेवांमध्ये येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्यचा सर्वसमावेशक धोरणामुळे हा बदल जाणवत आहे. या सरकारच्या आधी असे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न झाले नाहीत.' २०१४ च्या पूर्वी केवळ २ कोटी ९४ लाख अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती. २०१४ नंतर गेल्या ६ वर्षांत अल्पसंख्याक समुदायाच्या ४ कोटी ६० लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. केंद्रीय कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे देखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की केंद्राची नयी उडान योजना नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यास समुदायाच्या युवकांना मदत करेल. या योजनेच्या माध्यमातून नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्णय करणाऱ्या उमेदवारांना आर्थिक मदत करण्यात येते. २०१९ पासून या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा देखील ६ लाख रुपयांपासून वाढवून आठ लाख रुपये करण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34d4qfJ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments