गेट 2021 परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Registration: गेट परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत बुधवारी ३० सप्टेंबर रोजी संपत होती. मात्र ती आता ७ ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. उमेदवार नियमित अर्ज शुल्कासह ७ ऑक्टोबरवर्यंत अर्ज करू शकतात. आयआयटी मुंबईने गेल परीक्षेसाठी अर्ज आपल्या अधिकृत संकेतस्थळावर gate.iitb.ac.in वर उपलब्ध करून दिले आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांना ७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी, तसेच अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेट परीक्षा आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी https://ift.tt/30VYu8P या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावयाचा आहे. ची आयोजक संस्था आयआयटी मुंबई आहे. ही परीक्षा ५ ते ७ फेब्रुवारी २०२१ आणि १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ अशा दोन टप्प्यांत पार पडणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया यंदा ऑनलाइन असणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करताना गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र हवेच, असे बंधन नसणार आहे. यामुळे अंतिम वर्षास पात्र विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत. गेट ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टीम (GOAPS) च्या मार्फत ही अर्ज प्रक्रिया होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. विद्यार्थी विलंब शुल्कासह ७ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर पुन्हा अतिरिक्त शुल्कासह कॅटेगरी, पेपर आणि परीक्षा केंद्राचं शहर बदलण्यासाठी १३ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ असेल. अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ रोजी जारी केले जाईल. निकाल २२ मार्च २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा संगणक आधारित असेल आणि तीन तास कालावधीची असेल. GATE 2021: काही महत्त्वाच्या तारखा नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अखेरची तारीख - ७ ऑक्टोबर २०२० अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख - ८ जानेवारी २०२१ - ५, ६,७,१३,१३,१४ फेब्रुवारी २०२१ निकाल - २२ मार्च २०२१ गेट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी गेट स्कोअर वैध असतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2HFH21g
via IFTTT

Post a Comment

0 Comments