Also visit www.atgnews.com
कला विषयक अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक जाहीर
Art Directorate Admission 2020: कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पदविका आणि प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रम प्रवेशासाठीचे वेळापत्रक असणार आहे. विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार http:///cetcell.net/doa/ या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावयाचे आहेत. प्रवेशाचे निकष www.doa.org.in या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण व आर्ट मास्टर या पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवाराद्वारे वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करणे, कॉलेज व अभ्यासक्रम निवडणे, कागदपत्रांच्या छायांप्रती (स्कॅन) अपलोड करणे यासाठी ९ ते १९ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड याद्या २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास २३ सप्टेंबर रोजी सादर करता येतील. २४ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. संबंधित कॉलेजांकडून २५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घेता येणार असल्याचे कला संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. कला संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पदविका अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याविषयी डेमो पाहण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RabnGO
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments