सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षांवर आज सुनावणी

10th & 12th compartment exam 2020 latest updates: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे सप्टेंबर मध्या दहावी, बारावीच्या कंपार्टमेट परीक्षा म्हणजेच फेरपरीक्षांचे आयोजन करण्याचा बोर्डाचा मानस आहे. मात्र या परीक्षांना विरोध होत आहे. या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज शुक्रवारी ४ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ या याचिकेवर सुनावणी देणार आहे. दहावी आणि बारावीचे एकूण २ लाख ३७ हजार ८४९ विद्यार्थी कंपार्टमेंट श्रेणीत येतात. या परीक्षा कोविड - १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द व्हाव्यात, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. न्या. ए.एम. खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि संजीव खन्ना यांचे खंडपीठ या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. करोना काळात संपूर्ण सुरक्षेसह कंपार्टमेंट परीक्षा घेणे बोर्डासाठी अशक्य आहे. शिवाय परीक्षांना विलंब झाला असल्याने विदयार्थ्यांचे भविष्य अधांतरी होईल. अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या फेरपरीक्षा रद्द कराव्यात अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. सीबीएसईचं काय म्हणणं? सीबीएसईने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ६ ऑगस्ट रोजी एक नोटीस जारी केली होती. यात म्हटलं होतं की सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार १ ते १५ जुलै २०२० पर्यंत होणाऱ्या परीक्षांचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जारी केले आहेत. जे या निकालाने समाधानी नाहीत, त्यांना श्रेणीसुधार परीक्षेत सहभागी होऊन गुण वाढवण्याची संधी दिली जाईल. कंपार्टमेंट परीक्षेबद्दल बोर्डाने म्हटलं होतं, की कोविड -१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सुरक्षेसह परीक्षा घेतल्या जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Z43qr1
via IFTTT

Post a Comment

0 Comments