पदवी परीक्षा ऑक्टोबरमध्ये; प्रॅक्टिकल परीक्षा १५ सप्टेंबरपासून

Final Year Exams 2020: पदवी परीक्षा कधी होणार यावर गुरुवारी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अधिक स्पष्टपणे भाष्य केले. पदवी परीक्षांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत लावायचे आहेत. त्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते ३० सप्टेंबर घेण्याचा प्रयत्न असणार आहे. लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील, त्यांच्या तारखा विद्यापीठे त्यांच्या स्तरावर जाहीर करतील, असे सामंत यांनी गुरुवारी सांगितले. शुक्रवारी दुपारी १२ वाजता कुलगुरू समितीच्या अहवालाच्या शिफारशी जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यान, गुरुवारी दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उदय सामंत आणि कुलगुरू समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, 'परीक्षा सोप्या पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्यपालही अनुकूल आहेत. शिवाय विद्यार्थ्यांनी घरी बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी दिली आहे.' पदवीच्या अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांना एटीकेटी लागलेली आहे, त्यांच्या एटीकेटी परीक्षाही पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांप्रमाणेच घेण्यात येतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. 'ज्याअर्थी प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत लावायचे आहेत, त्याअर्थी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून पदवी परीक्षांना सुरूवात होईल हे स्पष्ट आहे. विविध विद्यापीठे त्यांच्या स्तरावर तारखा पुढे-मागे ठरवतील,' असे सामंत म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2F1O2nT
via IFTTT

Post a Comment

0 Comments