मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा १ ते १७ ऑक्टोबर दरम्यान

Mumbai University Final Year Exam 2020: मुंबई विद्यापीठाने पदवी परीक्षांबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, नियमित थिअरी परीक्षा १ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत तर बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबरपासून MCQ पद्धतीने होणार आहेत. सर्व थिअरी परीक्षा ५० गुणांसाठी आणि एक तासाच्या कालावधीच्या असतील. परीक्षा कशा होणार याची सर्व इत्यंभूत माहिती या वृत्तात सविस्तर देण्यात येत आहे. परीक्षा महाविद्यालय स्तरावर मुंबई विद्यापीठाने परीक्षांच्या आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. क्लस्टर पद्धतीने महाविद्यालय जाणार आहेत. म्हणजेच एक लीड महाविद्यालय आणि त्याअंतर्गत त्या परिसरातील ६ ते ७ विद्यालय अशी मिळून क्लस्टर्स असतील. या एका क्लस्टरमध्ये एका वेळी एका वेळापत्रकानुसार, परीक्षा होतील. प्रश्नपत्रिकाही क्लस्टरनिहाय असतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाकडून सूचना मिळतील. अभ्यासक्रम कोणता? सर्व थेअरी परीक्षा १३ मार्च २०२० पर्यंत महाविद्यालयात शिकवण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. परीक्षा पद्धती सर्व थेअरी परीक्षा ऑनलाइन होतील. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतील. परीक्षा ५० गुणांसाठी आणि १ तास कालावधीची असेल. मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक विषयाची थेअरी परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक महाविद्यालयाने लगेचच मूल्यांकन प्रक्रिया सुरू करून विद्यार्थ्याचे गुण तयार करावेत, थेअरी परीक्षेचे मूल्यांकन हे ५० गुणांचे असल्यामुळे संबंधित विषयाच्या कमाल (६०, ७५, ८०, १०० इत्यादी) गुणांनुसार रुपांतर करून दोन दिवसांच्या आत विद्यापीठाच्या ऑनलाइन सिस्टिमध्ये अपलोड करावेत, अशा सूचना विद्यापीठाने कॉलेजांना दिल्या आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी... दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेअरी परीक्षेसाठी आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात, (उदा. अतिरिक्त वेळ, लेखनिक इत्यादी.) असे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी? बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबर २०२० पासून सुरू कराव्यात, असे निर्देश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत. जर बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कॉलेजने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेतल्या असतील, तर पुन्हा घेऊ नयेत. अन्य सर्व माहितीसाठी विद्यापीठाचे परिपत्रक येथे देण्यात येत आहे - प्रॅक्टिकल / प्रोजेक्ट / व्हायव्हा परीक्षा कशा? प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या महाविद्यालयातील शिक्षकांच्या सहाय्याने ऑनलाइन पद्धतीने (झूम अॅप, गुगल मीट, स्काइप आदींवर) किंवा आवश्यकतेनुसार दूरध्वनीद्वारे व्हायवा म्हणजेच मौखित परीक्षा घ्यावी. या परीक्षा १५ सप्टेंबर २०२० पासून घ्याव्यात. परीक्षा हुकल्यास... जे विद्यार्थी काही कारणास्तव ऑनलाइन थिअरी परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांना पुन्हा संधी देण्याविषयी क्लस्टरमधील लीड महाविद्यालयामार्फत एकत्रित निर्णय घेतला जाऊन अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन परीक्षा देण्याची सुविधा नसल्यास... ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध नसेल त्यांच्यासाठी ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3idUYwG
via IFTTT

Post a Comment

0 Comments