केंद्र सरकारी नोकरीची संधी; सी-डॅकमध्ये भरती

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग अर्थात C-DAC मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचे आहेत. विविध १३९ रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे. अर्ज करण्याची अखेरची मुदत ९ ऑक्टोबर २०२० आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी अर्ज कसा आणि कुठे करायचा, कोणकोणती पदे रिक्त आहेत, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आदी सर्व तपशील या वृत्तात देत आहोत. तसेच सविस्तर माहितीसाठी अर्जाच्या नोटिफिकेशनची थेट लिंकही या वृत्ताच्या अखेरीस देत आहोत. पदाचे नाव — १. प्रोजेक्ट इंजिनिअर २. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ एकूण रिक्त पदे — १३९ शैक्षिणक पात्रता — १. प्रथम श्रेणी B.Sc/ B.E/Ph.D/M.Sc./B. Tech/M.Tech/MCA २. ५०% गुणांसह पदवीधर अर्ज प्रक्रियेला सुरुवात - २५ सप्टेंबर २०२० अर्ज करण्याची अंतिम मुदत - ०९ ऑक्टोबर २०२० अर्ज फी शुल्क — General/OBC: ५०० रुपये SC/ST/PWD/EWS: नि:शुल्क नोकरीचे ठिकाण — पुणे / दिल्ली / भुवनेश्वर लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे ही निवड प्रक्रिया होणार आहे. C-DAC भरतीसंदर्भातील नोटिफिकेशन वाचण्यासाठी C-DAC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30hlgHv
via IFTTT

Post a Comment

0 Comments