जेईई मेनच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल लोकल सेवा

JEE Main 2020: पश्चिम रेल्वेने जेईई मेन २०२० परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लोकल सेवा सुरू केली आहे. प. रेल्वेने आज ही घोषणा केली. यानुसार १ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधी विद्यार्थ्यांसाठी मध्य रेल्वेवर १२ विशेष गाड्या धावणार आहेत. यापैकी ६ गाड्या अप तर ६ गाड्या डाऊन मार्गावर धावतील. पश्चिम रेल्वेवर १ ते ६ सप्टेंबर दरम्यान २३ अप आणि २३ डाऊन गाड्या धावणार आहेत. यापैकी काही गाड्या सकाळच्या वेळात तर काही गाड्या सायंकाळच्या वेळात सुटणार आहेत. या विशेष गाड्यांव्यतिरिक्तही रेल्वेने प्रवास करण्याची मुभा या विद्यार्थी-पालकांना परीक्षेच्या कालावधीत देण्यात आली आहे. या लोकल सेवांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे - मध्य रेल्वेवरील गाड्यांच्या वेळा अशा असतील - 6 UP सेवा- 1) KYN DEPT 06.16 HRS CSMT ARL 07.21 HRS 2) KYN DEPT 06.21 HRS CSMT ARL 07.26 HRS 3) PNVL DEPT 06.20 HRS CSMT ARL 07.35 HRS 4) CLA DEPT 17.50 HRS CSMT ARL 18.15 HRS 5) CLA DEPT 18.10 HRS CSMT ARL 18.35 HRS 6) VSH DEPT 17.40 HRS CSMT ARL 18.25 HRS 6 DN सेवा - 1) CSMT DEP 07.30 HRS KYN ARL 08.35 HRS 2) CSMT DEP 07.45 HRS KYN ARL 08.50 HRS 3) CSMT DEP 07.50 HRS PNVL ARL 09.10 HRS 4) CSMT DEP 18.35 HRS KYN ARL 19.40 HRS 5) CSMT DEP 18.44 HRS KYN ARL 19.49 HRS 6) CSMT DEP 18.40 HRS PNVL ARL 20.00 HRS पश्चिम रेल्वेवरील २३ अप आणि २३ डाऊन लोकल फेऱ्यांची संख्या पुढील प्रमाणे - जेईई मेन परीक्षा देणाऱ्या मुंबई आणि उपनगरातील विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड दाखवून त्यांना हा प्रवास करता येणार आहे. दरम्यान, जेईई मेन प्रमाणेच नीट यूजी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नीट यूजी परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bed3rM
via IFTTT

Post a Comment

0 Comments