स्टाफ सिलेक्शन कमिशन: अनेक परीक्षांच्या निकालांच्या तारखा जाहीर

CGL, , JE 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) ने अनेक भरती परीक्षांच्या निकालांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यात कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल टीअर ३ (CGL tire 3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), ज्युनिअर इंजिनीअर (JE) यासारख्या अनेक परीक्षांचा समावेश आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने मंगळवारी १ सप्टेंबर २०२० रोजी ही माहिती दिली. त्यानुसार २०१८ ते २०२० पर्यंत झालेल्या कमिशनच्या विविध भरती परीक्षांच्या निकालांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. SSC Recruitment Exam Results: कधी, कोणता निकाल? एसएससी ज्युनियर इंजिनीअर (सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, क्वांटिटी सर्वेईंग अँड कॉन्ट्रॅक्ट्स) एक्झाम २०१८ (पेपर २) चा निकाल - २१ सप्टेंबर २०२० एसएससी मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) एक्झाम २०१९ (पेपर २) चा निकाल - ३१ ऑक्टोबर २०२० एसएससी सीजीएल (टियर -३) २०१८ चा निकाल - ०४ ऑक्टोबर २०२० स्टाफ सिलेक्शन कमिशनने हेही सांगितले आहे की या तारखा संभाव्य आहेत. प्रशासकीय किंवा अन्य कारणांमुळे निकालाच्या तारखांमध्ये बदल संभवतो. जे उमेदवार या परीक्षांमध्ये समाविष्ट झाले होते त्यांनी निकालाची प्रतीक्षा करावा. वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर ssc.nic.in वर जाऊन अद्ययावत माहिती घ्यावी. च्या अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QO1mig
via IFTTT

Post a Comment

0 Comments