नीट परीक्षा स्थगित होणार का? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

2020 latest updates: देशभरात इंजिनीअरिंग प्रवेशांसाठी जेईई मेन परीक्षा सुरू आहे. आज परीक्षेचा चौथा दिवस आहे. ६ सप्टेंबरपर्यंत ही परीक्षा संपणार आहे. पण दुसरीकडे परीक्षेवरील टांगती तलवार अजूनही कायम आहे. आज नीट संदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जारी केलेल्या वेळापत्रकानुसार नीट परीक्षेचे आयोजन १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली जात आहे. हे प्रकरण पुन्हा एकवार सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. आज यावर सुनावणी होणार आहे. मागील शुक्रवारी बिगर भाजप सरकार असलेल्या ६ राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. यात सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे की न्यायालयाने नीट-जेईई वरील आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. सर्वोच्च न्यायालयाने या परीक्षा घेतल्या जायला हव्यात, असा निर्णय दिला आहे. दरम्यान, जेईई मेन सुरू झाली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय नीट परीक्षेसंदर्भात सुनावणी देईल. न्या. अशोक भूषण, न्या. बी. आर. गवई आणि न्या. कृष्ण मुरारी यांचे खंडपीठ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेणार आहे. कोणत्या राज्यांची याचिका? परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी देशातील ६ राज्यांनी केली आहे. महाराष्ट्रासह पंजाब, राजस्थान, प. बंगाल, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे. नीट यूजी (NEET UG 2020) परीक्षेसाठी सुमारे १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ही परीक्षा पेन-पेपर पद्धतीने एकाच दिवशी, एकाच सत्रात देशभरात होणार आहे. यासाठी एनटीएने देशभरात ३,८४३ परीक्षा केंद्रांची व्यवस्था केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Z5xjHv
via IFTTT

Post a Comment

0 Comments