CLAT 2020: जरूरी सूचना; तुम्हाला परीक्षा देता येणार की नाही, जाणून घ्या

exam guidelines: देशातील विविध राष्ट्रीय विधी विद्यापीठांमध्ये (NLU) प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेसाठी कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट (CLAT) २८ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. या परीक्षेसंदर्भात एनएलयूच्या कन्सोर्टियमने अनेक नोटिसा जारी केल्या आहेत. यामध्ये परीक्षेबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. जर आपण सीएलएटी 2020 साठी अर्ज केला असेल तर परीक्षेपूर्वी या सूचना अवश्य जाणून घ्या. जन्मतारखेच्या दुरुस्तीसाठी सूचना पहिली सूचना अर्जातील जन्म तारखेच्या संबंधात आहे. त्यात नमूद केले आहे की अर्जात जन्मतारखेची सुधारणा करण्याची लिंक consortiumofnlus.ac.in या अधिकृत वेबसाइटवर सक्रिय करण्यात आली आहे. २६ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत उमेदवार त्यात सुधारणा करू शकतात. यानंतर मात्र दुरुस्तीसाठी कोणतीही संधी मिळणार नाही. कन्सोर्टियम ऑफ एनएलयूने नमूद केले आहे की अर्जात दुरुस्त केलेली जन्मतारीख पुढील प्रक्रियेत अद्ययावत केली जाईल. मात्र, प्रवेश पत्रात नमूद केलेली तारीख तशीच राहील. कोविड -१९ बाबत सूचना कोविड -१९ साथीच्या काळात ही परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या संदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत. कन्सोर्टियमच्या गाईडलाइन्सनुसार, 'जे उमेदवार कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून येईल, जे वैद्यकीय निरीक्षणाखाली असतील किंवा विलगीकरणात असतील, त्यांना मध्ये सहभागी होता येणार नाही.' परीक्षेच्या दिवसासाठी इतर महत्वाच्या सूचना २८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत संगणक आधारित पद्धतीने घेण्यात येतील. दोन तासांच्या परीक्षेमध्ये यूजी अभ्यासक्रमांसाठी एकूण १५० प्रश्न तर पीजी कोर्ससाठी १२० प्रश्न विचारले जातील. उमेदवारांना परीक्षेच्या एक तास आधी केंद्रावर पोहोचावे लागेल. परीक्षा सुरू होण्याच्या १५ मिनिटे आधी प्रवेश बंद होईल. यानंतर कोणत्याही परिस्थितीत केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही आणि उमेदवार परीक्षा देऊ शकणार नाहीत. जर आपण रफ कागद वापरत असाल तर त्यावर आपला रोल नंबर लिहा आणि परीक्षेनंतर तिथे ठेवलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये ठेवा. परीक्षेत या गोष्टी जरूर घेऊन जा - पारदर्शक पाण्याची बाटली - मास्क, ग्लोव्हज, हँड सॅनिटायझर ( ५० एमएल) - सेल्फ हेल्थ डिक्लरेशन - पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट (जर या श्रेणीनुसार अर्ज केला असेल तर) - निळे किंवा काळे बॉलपेन - अ‍ॅडमिट कार्ड - वैध फोटो आयडी कार्ड


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35YMjuV
via IFTTT

Post a Comment

0 Comments