Also visit www.atgnews.com
CLAT 2020 : निकालाची तारीख, प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
Result 2020: कन्सोर्टियम ऑफ एनएलयूने क्लॅट २०२० परीक्षा होण्याआधीच एक पोस्ट-एक्झाम कॅलेंडर जारी केले आहे. क्लॅट २०२० परीक्षा येत्या २८ सप्टेंबर रोजी होत आहे. कन्सोर्टियमच्या निर्णयानुसार, निकालाच्या प्रक्रियेला कोणताही विलंब न करता तत्काळ सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत परीक्षा झाली की तत्काळ त्याच दिवशी आन्सर की म्हणजेच गुणतालिका जाहीर करण्यात येणार आहे. कोविड - १९ महामारीमुळे ही परीक्षा आधीच खूप वेळा लांबणीवर पडली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ताज्या गाईडलाइन्सनुसार, महाविद्यालये १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. ही उत्तरतालिका प्राथमिक स्वरुपाची असणार आहे. विद्यार्थ्यांना काही हरकती नोंदवायच्या असतील तर त्यासाठी २९ सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंतचा वेळ दिला जाणार आहे. हरकत पुरावा आणि शुल्कासह पाठवायच्या आहेत. जर हरकतींचा स्वीकार झाला तर ते उत्तर अंतिम उत्तरतालिकेच समाविष्ट करण्यात येईल. वेळापत्रकानुसार अंतिम उत्तरतालिका ३ ऑक्टोबर रोजी अपलोड केली जाणार आहे. अंतिम निकाल ५ ऑक्टोबर रोजी गुणवत्ता यादीसह जाहीर केला जाणार आहे. काउन्सेलिंग गुणवत्ता यादीनुसार होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कॉलेज आणि अभ्यासक्रम निवडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर त्यांचे गुणवत्ता यादीतील स्थान आणि त्यांचे पसंतीक्रम यानुसार प्रवेश दिले जातील. काउन्सेलिंग प्रक्रिया ९ ते १५ ऑक्टोबरदरम्यान होईल. उमेदवारांना काऊन्सेलिंग फी म्हणून ५० हजार रुपये भरावे लागतील. यासाठी ६ आणि ७ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला जाईल. हे शुल्क त्यांच्या युनिव्हर्सिटी फीमध्ये अॅडजस्ट केले जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i38H8U
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments