CLAT २०२० परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी

CLAT 2020: कंसोर्टिअम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (CNLU) ने क्लॅट २०२० चे अॅडमिट कार्ड उपलब्ध केले आहेत. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते क्लॅटच्या अधिकृत संकेतस्थळावरून ते डाऊनलोड करू शकतात. consortiumofnlus.ac.in हा या संकेतस्थळाचा अॅड्रेस आहे. याव्यतिरिक्त या वृत्ताच्या अखेरीस अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंकही देण्यात आली आहे. कंसोर्टिअम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजद्वारे विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते. येत्या २८ सप्टेंबर रोजी देशभरात विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ४ या एकाच सत्रात असेल. ही परीक्षा संगणकीकृत असणार आहे. परीक्षा देशभरातील २२ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतील प्रवेशांसाठी आयोजित केली जाते. राष्ट्री स्तरावरील या परीक्षेती मेरिटच्या आधारे नॅशनल लॉ युनिवर्सिटीत बॅचलर आणि मास्टर्स डिग्री अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. ही परीक्षा देशभरात २०३ ठिकाणी आयोजित केली जाते. यंदा कोविड - १९ संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी दूरवर जाऊ लागू नये म्हणून जवळचे केंद्र दिले जाण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. सामान्यत: ही परीक्षा दरवर्षी मे महिन्यात होते. पण यंदा करोना संक्रमण संकटामुळे ती वारंवार पुढे ढकलण्यात आली. आधी ही परीक्षा ७ सप्टेंबर रोजी होणार होती, तेव्हाही ती लांबणीवर पडली आणि आता ती २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. CLAT admit card संबंधी जारी करण्यात आलेल्या सूचना वाचण्यासाठी थेट लिंकद्वारे क्लॅट २०२० अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी CLAT 2020 च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mtkP6j
via IFTTT

Post a Comment

0 Comments