Also visit www.atgnews.com
IBPS: ऑफिस असिस्टंट भरती परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी
RRB prelims admit card 2020: इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने परीक्षेचे अॅडमिट कार्ड मंगळवारी ८ सप्टेंबर २०२० रोजी जारी करण्यात आले आहेत. १९, २० आणि २६ सप्टेंबर रोजी ऑफिस असिस्टंट पदाच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षांसाठी हे प्रवेशपत्र जारी झाले आहे. दरम्यान, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आरआरबी पूर्व परीक्षा मात्र लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. आयबीपीएसचे अधिकृत संकेतस्थळ ibps.in वर जाऊन उमेदवारांना प्रवेश पत्र डाऊनलोड करता येणार आहे. या वृत्ताच्या अखेरीस आम्ही प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची थेट लिंक देत आहोत. ऑफिस असिस्टंट पदासाठी ही परीक्षा ऑनलाइन स्वरुपात होणार आहे. १९, २० आणि २६ सप्टेंबर २०२० रोजी ही परीक्षा होईल. पूर्व आणि मुख्य अशा दोन टप्प्यांत ही परीक्षा होणार आहे. जे उमेदवार पूर्व परीक्षेत पात्र ठरतील, त्यांना मुख्य परीक्षेत सहभागी होता येईल. उमेदवारांना अॅडमिट कार्डवर दिलेल्या किंवा एसएमएस / मेलद्वारे त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकाद्वारे परीक्षा केंद्रावर किती वाजता पोहोचायचे तो स्लॉट देण्यात येईल. या दिलेल्या स्लॉटमध्येच त्यांनी परीक्षा केंद्रावर पोहोचणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी मास्क, ग्लोव्ह्ज, पाण्याची पारदर्शक बाटली, वैयक्तिक सॅनिटायझर (५० एमएल), एक साधं पेन, परीक्षेसंदर्भातील कागदपत्रे (कॉल लेटर/अॅडमिट कार्ड, आयडी कार्ड (ओरिजनल), आयडी कार्डची फोटोकॉपी) आदी सोबत बाळगायचे आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35hKkkQ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments