JEE मुकलेल्या विदर्भातील विद्यार्थ्यांना न्यायालयाचा दिलासा

महाराष्ट्रातील विदर्भातील अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचता आलेले नाही. यासंदर्भात भंडाऱ्यातील एका पालकांनी याचिका दाखल केली आणि मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने त्यावर तात्काळ सुनावणी घेतली. विद्यार्थ्यांची परीक्षा हुकणार नाही, त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे पुन्हा परीक्षा घेण्याबाबत अर्ज करावा, असा आदेश नागपूर खंडपीठाने दिला. मात्र, येथील परीक्षा स्थगित करण्याचा आदेश देण्यास कोर्टाने नकार दिला. न्या. रवी देशपांडे आणि न्या. पुष्पा गनेडीवाला यांनी ही सुनावणी घेतली. त्यांनी सांगितले की नॅशनल टेस्टिंग एजन्सी या अर्जांवर जरुर विचार करेल आणि परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय देईल. संपूर्ण देशात १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ही परीक्षा सुरू झाली आहे. कोर्टाने सांगितलं की पुरस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिघडलेली आहे. परिणामी विद्यार्थी परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. यामुळे या विद्यार्थ्यांना नुकसान व्हायला नको. कारण यात या विद्यार्थ्यांची चूक नाही. कोर्टाने सांगितलं की विद्यार्थी आपल्या सेंटर को-ऑर्डिनेटरद्वारे एनटीएकडे अॅप्लिकेशन करू शकतात. यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी पुढील १५ दिवसांत स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून निर्णय घेईल. जेईई, नीटला मुकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही पूरस्थितीमुळे जेईई मेन, नीट परीक्षा देता न येणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. ते म्हणाले, 'या भागात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला हे परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा ही सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील जवळपास १५ हजारांहून अधिक विद्यार्थी ‘जेईई-मेन्स’मध्ये सहभागी होणार आहेत. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून पूलदेखील पाण्याखाली गेले आहेत. अशा स्थितीत गावांपासून परीक्षेच्या केंद्रावर पोहोचने अडचणीचे आहे.' ही पार्श्वभूमी लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तत्काळ केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशीही संवाद साधला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ESMMU1
via IFTTT

Post a Comment

0 Comments