Also visit www.atgnews.com
MHT-CET 2020: PCB ग्रुपचे अॅडमिट कार्ड जारी
MHT-CET 2020: महाराष्ट्र राज्याच्या सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात MHT-CET 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड सीईटी सेलने आज, शनिवार २६ सप्टेंबर पासून उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्यांना .mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. ते कसे डाऊनलोड करायचे याबाबतचा सविस्तर तपशील आम्ही या वृत्तात पुढे देत आहोत. हे अॅडमिट कार्ड केवळ PCB ग्रुपचे आहेत. एमएचटी-सीईटी परीक्षा १,२,४,५,६,७,८ आणि ९ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या MHT-CET अॅप्लिकेशन फॉर्म नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करायचे आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच PCM ग्रुप परीक्षेचे अॅडमिट कार्ड अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. यापूर्वी बी.फार्मसाठी सीईटी सेलने अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. हॉलतिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. तसेच कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारीविषयीदेखील अॅडमिट कार्डमध्ये विस्तृत माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्डवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, त्यात कोणत्याही प्रकारची चूक वा त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधायचा आहे. MHT CET Admit Card 2020 कसे डाऊनलोड कराल? - mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा. - MHT CET Admit Card 2020 डाऊनलोड लिंकवर क्लिक करा. - अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा. - आता स्क्रीनवर तुमचे MHT CET Admit Card 2020 अॅडमिट कार्ड दिसेल. - अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट काढून सुरक्षित ठेवा. अॅडमिट कार्ड डाऊनलोड कसे करायचे याची विस्तृत प्रोसेस सीईटी कक्षाने दिली आहे. MHT CET Admit Card 2020 डाऊनलोड करण्याची प्रक्रिया वाचण्यासाठी एकूण ४ लाख ४५ हजार ७८० विद्यार्थ्यांनी PCM आणि PCB कोर्सेसच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरचे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांकडे सक्षम प्राधिकरणाचे डोमिसाईल प्रमाणपत्र आणि जन्मदाखला किंवा रेसिडेन्शिअल सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी एमएचटी सीईटी बी फार्म परीक्षा देऊ शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SdBixT
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments