Also visit www.atgnews.com
SBI SO भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात
: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रक्रिया सुरू केली आहे. स्पेशालिस्ट केडर ऑफिसर्स पदांच्या भरतीसाही ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. १८ सप्टेंबर २०२० पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार SBI SO भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर bank.sbi/careers किंवा sbi.co.in/careers येथे ऑनलाइन अर्ज सबमीट करता येतील. अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ ऑक्टोबर आहे. निवड प्रक्रिया उमेदवार शॉर्टलिस्ट करून नंतर मुलाखतींद्वारे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. शॉर्टलिस्टिंग किमान पात्रता आणि अनुभव इतक्याच निकषांवर मुलाखतीला बोलावले जाणार नाही. शॉर्टलिस्टिंगसाठी बँकेने स्थापन केलेली समिती छाननीचे निकष ठरवेल आणि त्यानंतर त्यानुसार उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून मुलाखतीसाठी बोलावले जाईल. याबाबत बँकेचा निर्णय अंतिम राहील. मुलाखत मुलाखतीसाठी १०० गुण असतील. मुलाखतीसाठी पात्र गुण किती असावेत याचा निर्णय बँक घेईल. मेरिट लिस्ट मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. जर दोन उमेदवारांचे गुण सारखे असतील तर त्यांच्या वयाच्या आधारे यादीत क्रमवारी ठरेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2He0KAX
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments