unlock 5 : राज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने

नवी दिल्लीः केंद्र सरकारने बुधवारी अनलॉक ५.० साठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्याअंतर्गत केंद्राने शाळा, कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा निर्णय राज्यांवर ( schools reopening ) सोडला आहे. येत्या १५ ऑक्टोबरनंतर शाळा आणि कोचिंग क्लासेस सुरू करायचे की नाही याविषयी राज्य सरकार स्वत: निर्णय घेऊ शकणार आहेत. पण यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या परवानगीची आवश्यकता असेल. शाळा-महाविद्यालयासाठी अनलॉक - ५ मार्गदर्शक सूचना > केंद्र शासित प्रदेश आणि राज्य सरकारांना शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि कोचिंग संस्था टप्प्याटप्प्याने आणि परिस्थितीचं आकलन करून उघडण्याचा निर्णय घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ते घेऊ शकतील. पण यासाठी सरकार शाळा किंवा शिक्षण संस्था व्यवस्थापनाशी सल्ला मसलत करतील आणि दिलेल्या अटींचे पालन करतील. > ऑनलाइन शिक्षण किंवा दूरस्थ शिक्षण चालूच राहिल आणि सतत प्रोत्साहन दिले जाईल. > ज्या शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत आणि त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी शाळेत शारीरिक दृष्ट्या उपस्थित राहण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण घेऊ इच्छित आहे त्यांना यासाठी परवानगी दिली जाईल. > शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ पालकांच्या लेखी संमतीनेच लागू होईल. यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या एसओपीच्या आधारे स्थानिक आवश्यकतानुसार त्यांच्या संबंधित एसओपी तयार करतील. > दुसरीकडे, उच्च शिक्षण विभाग आणि शिक्षण मंत्रालय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून महाविद्यालय आणि उच्च शिक्षण संस्था उघडण्याचा निर्णय घेऊ शकतात. येथे ऑनलाइन क्लासेस आणि डिस्टन्स लर्निंग देखील सुरू ठेवले जाईल आणि प्रोत्साहित केले जातील. > उच्च शिक्षण संस्थांच्या पीएचडी विद्यार्थ्यांसाठी आणि पदव्युत्तर विज्ञान-तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसाठी, लॅब आणि व्यावहारिक वर्ग देखील १५ ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. > या सर्व संस्था पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सरकारचे निर्णय सक्तीचे असतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ELotaI
via IFTTT

Post a Comment

0 Comments