UPSC परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या मागणीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोविड-१९ संक्रमणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे, तसेच देशात अनेक राज्यांसमोर पुरामुळे उभ्या ठाकलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा किमान दोन-तीन महिने पुढे ढकलाव्यात अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. पुरस्थितीमुळे आलेली आपत्तीजनक स्थिती सामान्य होण्यास तसेच करोना संक्रमित रुग्णसंख्या कमी होण्यास पुढील किमान दोन-तीन महिन्यांचा अवधी लागू शकतो, तोपर्यंत या परीक्षा घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. गुरुवारी २४ सप्टेंबर २०२० रोजी न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. खन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सुनावणी दिली. खंडपीठाने यूपीएससीला नोटीस पाठवून या प्रकरणी उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. वासिरेड्डी गोवर्धन साई प्रकाश आणि अन्य यांनी ही याचिका दाखल केली आहे. ही परीक्षा सात तास इतक्या दीर्घ कालावधीची असते. देशातील लाखो उमेदवार ही परीक्षा देतात. पूर्व परीक्षेसाठी ७२ शहरात परीक्षा केंद्र असणार आहेत. या सर्व मुद्द्यांचा विचार व्हावा. ही परीक्षा घेऊन आयोग लाखो उमेदवारांचे आरोग्य धोक्यात घालत आहे, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही शैक्षणिक परीक्षा नाही. ही परीक्षा लांबणीवर पडली तर कोणाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. ही भरती परीक्षा आहे, त्यामुळे ती पुढे ढकलली जाऊ शकते, असे याचिकेत म्हटले आहे. 'कोविड-१९ महामारीचा काळ असूनही केंद्रीय लोकसेवा आयोगाने परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ केलेली नाही. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने उमेदवार ही परीक्षा देतात, त्यांना परीक्षेसाठी अक्षरश: ३००-४०० कि.मी.चा प्रवास करावा लागणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करत असताना उमेदवारांना संसर्गाची भीती आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार व्हावा,' असं याचिकेत म्हटलं आहे. विद्यमान वेळापत्रकानुसार, यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० रोजी ऑफलाइन मोडवर होणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे ६ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. देशभरात ७२ शहरांमध्ये परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mWI1dA
via IFTTT

Post a Comment

0 Comments