गांधी जयंती विशेष: महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार

महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी देशभरात साजरी केली जाते. गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला होता. मोहनदास करमचंद गांधी सत्य आणि अहिंसेचे पुजारी होते. त्यांनी जगाला अहिंसेचा मंत्र दिला. या अहिंसेच्याच बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधीजी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. गांधीजींच्या विचारांच्या मार्गाने आजही लाखो लोक जातात. गांधी जयंतीनिमित्त गांधीजींचे निवडक विचार पाहू... 'आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, त्यानंतर तुमच्यावर हसतील, नंतर ते तुमच्याशी लढतील आणि तेव्हा तुम्ही जिंकाल.' - महात्मा गांधी एका राष्ट्राची संस्कृती लोकांच्या मनात आणि आत्म्यात वसते. - महात्मा गांधी देशाची महानता आणि त्याच्या नैतिक प्रगतीचा अंदाज आपल्याला तेथील प्राण्यांशी होणाऱ्या व्यवहाराने येऊ शकतो. - महात्मा गांधी तुम्ही जे काम कराल ते महत्त्वाचं असू शकतं; पण तुम्ही काहीतरी काम करणं, हे सर्वात महत्त्वाचं असतं. - महात्मा गांधी प्रसन्नता हे एकमेव असं अत्तर आहे, जे तुम्ही दुसऱ्यांवर शिंपडलं की त्याचे काही थेंब तुमच्या अंगावरी पडतात. - महात्मा गांधी असं जगा की उद्या तुम्ही मरणार आहात आणि असं शिका की तुम्हाला कायम जिवंत राहायचं आहे. - महात्मा गांधी कोणी भेकड प्रेम करू शकत नाही, प्रेम करणं हे शौर्याचं प्रतिक आहे. - महात्मा गांधी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36wrd7c
via IFTTT

Post a Comment

0 Comments