यूपीएससी पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जाहीर

Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका जाहीर केली आहे. ही परीक्षा रविवारी ४ ऑक्टोबर २०२० रोजी देशभरात पार पडली. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर ही प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे. परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार या संकेतस्थळावरून प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकतात. नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल कधी? केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी २०१९ मध्ये पूर्व परीक्षा जून महिन्यात झाली होती आणि निकाल जुलै महिन्यात लागला होता. त्यामुळे ४ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या पूर्व परीक्षेचा निकाल नोव्हेंबरमध्ये जाहीर केला जाऊ शकतो. उमेदवारांच्या गुणांसह त्यांची नावे निकालानंतर जाहीर केली जातील. उमेदवारांची नावे आणि गुण यांच्या यादी निकालानंतर २-३ दिवसात जारी केली जाते. पूर्व परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा जानेवारी २०२१ मध्ये आयोजित केली जाणार आहे. दोन सत्रात झाली होती परीक्षा सिव्हिल सर्व्हिस प्रिलीमिनरी परीक्षा दोन शिफ्टमध्ये झाली होती. पहिली शिफ्ट सकाळी ९.३० वाजता आणि दुसरी शिफ्ट दुपारी २.३० वाजता सुरू झाली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2GGbsjk
via IFTTT

Post a Comment

0 Comments