Also visit www.atgnews.com
केंद्र सरकारी नोकरीची संधी; वेतन ५० हजार ते २ लाख मासिक
2020: डिप्लोमा, सामान्य पदवीधर ते अभियंते व डॉक्टरांपर्यंत विविध शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारची नोकरी मिळण्याची संधी चालून आली आहे. भारत सरकारची कंपनी ऑयल इंडियाने ग्रुप ए, बी आणि सीमध्ये वेगवेगळ्या रिक्त पदांवर भरती सुरू केली आहे. अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या रिक्त पदांसाठी ५० हजार रुपयांपासून २.२० लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीचा तपशील, अधिकृत नोटिफिकेशन, ऑनलाइन अर्जाची लिंक आदी माहीती देण्यात येत आहे. कोणकोणत्या पदांवर भरती? गट ए मानसोपचारतज्ज्ञ - ०१ पद कॉन्फिडेन्शियल सेक्रेटरी - ०१ पद गट ब वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी - 03 पदे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी - 02 पदे वरिष्ठ अधिकारी (विद्युत) - 05 पदे वरिष्ठ अधिकारी (मनुष्यबळ) - 02 पदे वरिष्ठ अधिकारी (लीगल) - ०२ पदे वरिष्ठ अधिकारी (मेकॅनिकल) - १८ पदे वरिष्ठ अधिकारी (इन्स्ट्रूमेंटेशन) - ०४ पदे वरिष्ठ अधिकारी (जिओफिजिक्स) - ०५ पदे वरिष्ठ अधिकारी (जलाशय) - ०१ पद गट सी सुपरिटेंडिंग इंजिनीअर - ०३ पदे व्यवस्थापक (लेखा) - ०१ पद अधीक्षक वैद्यकीय अधिकारी (ईएनटी) - ०१ पद अधीक्षक वैद्यकीय अधिकारी (पॅथॉलॉजी) - ०१ पद अधीक्षक वैद्यकीय अधिकारी (ऑप्थॅल्मोलॉजी) - ०१ पद अधीक्षक वैद्यकीय अधिकारी (ऑर्थोपेडिक सर्जन) - ०१ पद अधीक्षक वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) - ०१ पद सुपरीटेन्डिंग मेडिकल ऑफिसर (फिजिशियन) - ०१ पद पदांची एकूण संख्या - ५४ आवश्यक पात्रता विविध पदांसाठी विविध प्रकारची शैक्षणिक अर्हता अनिवार्य आहे. वयोमर्यादा देखील पदांनुसार वेगवेगळी आहे. याबाबतची विस्तृत माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. नोटिफिकेशनची थेट लिंक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात येत आहे. अर्जांची माहिती ऑइल इंडियाच्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर आहे. अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी, एनसीएल प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. अन्य सर्व प्रवर्गांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. थेट लिंक्स नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा Oil India च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34vdr3l
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments