Also visit www.atgnews.com
दिल्लीत पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार शाळा
करोना व्हायरसचा कहर कायम आहे. करोनाची परिस्थिती पाहता पुढील आदेश येईपर्यंत दिल्लीतील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ही घोषणा केली आहे. मनीष सिसोदिया म्हणाले, 'मला खूप पालक, शिक्षक भेटले, ते हाच सल्ला देत आहेत की शाळा सध्या सुरू करू नयेत.' ते पुढे म्हणाले, 'जगात जिथे शाळा सुरू आहेत तेथे करोनाची भीती अजून दूर गेलेली नाही आणि मुलांमध्येही करोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे. पालक म्हणून मी आणि मुख्यमंत्री हा विचार करत आहोत की मुलांना सध्या शाळेत पाठवायचे की नाही?' पुढील आदेश येईपर्यंत सर्व सरकारी, खाजगी आणि महानगरपालिका शाळा बंद राहतील आणि शाळा सुरू करण्याबाबत जेव्हा जेव्हा निर्णय घेतला जाईल तेव्हा सर्व संबंधितांना त्याविषयी कळविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. मनीष सिसोदिया यांनी हेही जाहीर केले आहे की दिल्ली सरकारने आयपी विद्यापीठात १,३३० नवीन जागा वाढवल्या आहेत, या जागांवरील प्रवेश याच सत्रापासून लागू होतील. सरकारी शाळांचा दौरा मनीष सिसोदिया यांनी दिल्लीच्या पश्चिम विहारमधील राजकीय प्रतिभा विकास विद्यालयाचा दौरा केला. या शाळेतील २७ विद्यार्थी जेईई आणि नीट परीक्षेत चमकले आहेत. सिसोदिया यांनी जेईई, नीटची तयारी करून घेणाऱ्या शिक्षक आणि मुख्याध्याकपांचे अभिनंदन केले. नीट परीक्षा देणारे ५६९ विद्यार्थी दिल्लीतील सरकारी शाळांमधील आहेत. यापैकी ३७९ मुलींनी नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. दिल्ली सरकारी शाळांमधील नीट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण ६७ टक्के आहे. ४४३ विद्यार्थी संयुक्त प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31Qqpab
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments