Also visit www.atgnews.com
...तर उर्वरित २८९ विद्यार्थ्यांचे नुकसान; ७०:३० कोट्यावर सरकारची भूमिका
म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर मागील शैक्षणिक सत्रातील मेडिकल पदवी कोर्सच्या गुणवत्ता यादीतून ७०:३० चा कोटा रद्द करून राज्याची एकच गुणवत्ता यादी लागू केल्यास उर्वरित महाराष्ट्रातील २८९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, तर विदर्भातील ९६ आणि मराठवाडातील १८९ अतिरिक्त विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश मिळू शकतो, असे आश्वर्यकारक शपथपत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केले आहे. राज्य सरकारने मेडिकल प्रवेशातून रिजनल व राज्य कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका निकिता लखोटीया या विद्यार्थीनीने उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर न्या. अतुल चांदूरकर आणि न्या. नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दरम्यान, रिजनल कोटा रद्द करण्याच्या निर्णयाला औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठासमोर एकूण पाच याचिका दाखल झाल्या आहेत. त्या याचिकांवर एकत्रित सुनवणीसाठी मुख्य न्यायमूर्तींकडे अर्ज केला आहे, असे सरकारने नमूद केले. नीटचा निकाल १६ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. तेव्हा नागपूर खंडपीठाने १६ तारखेलाच याचिकेवर सुनावणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. राज्य सरकारच्या शपथपत्रात काही महत्त्वाची आकडेवारी देण्यात आली आहे. सरकारने २०१९-२०२० या सत्रात झालेल्या मेडिकल प्रवेशाचा दाखला दिला आहे. त्यात राज्यात एकूण ४१ मेडिकल कॉलेजमध्ये ६ हजार २५० पदवी अभ्यासक्रमाच्या जागा आहेत. त्यापैकी केंद्राचा ९९७ जागांचा कोटा वजा केल्यास ५२५३ जागा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिल्लक राहतात. राज्याच्या एकूण ५२५३ जागांना ७० टक्के रिजनल आणि ३० टक्के राज्य कोटा लावला तर उर्वरित महाराष्ट्राला ३९११, विदर्भाला २४१२ आणि मराठवाड्याला २०८८ जागा प्रवेशाकरिता उपलब्ध होतात. त्यानुसार गेल्या शैक्षणिक सत्रात उर्वरित महाराष्ट्रातील ३९११ जागांवर २७३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, विदर्भातील २४१२ जागांवर १३२३ विद्यार्थी आणि मराठवाड्यातील २०८८ जागांवर ११९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. जर ७०:३० हे आरक्षण रद्द केल्यास एकूण राज्याच्या ५२५३ जागांवर उर्वरित महाराष्ट्रातील २४५३ म्हणजेचा रिजनल कोट्यातील उपलब्ध जागांपैकी २८९ विद्यार्थी कमी संख्येने प्रवेश घेतील. तर विदर्भातील १४१९ आणि मराठवाड्यातील १३८१ विद्यार्थी प्रवेश घेतील. रिजनल कोटा रद्द केल्यास विदर्भातील ९६ आणि मराठवाड्यातील १८९ विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. परंतु, ही प्रवेश् प्रक्रिया संपूर्णपणे गुणवत्ता यादीवर अवलंबून असून गुणवत्ता यादीतील मेरीट क्रमांक दरवर्षी बदलतात, असेही शपथपत्रात नमूद केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33RyZHk
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments