Also visit www.atgnews.com
नीटमध्ये पहिल्यांदाच रचला इतिहास; दोन विद्यार्थ्यांना १०० टक्के!
NEET Toppers 2020: नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) अर्थात नीट या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षेत यंदा प्रथमच एक इतिहास रचला गेला आहे. नीटमध्ये एक नव्हे तर दोन विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. ओडिशाचा शोएब आफताब आणि आकांक्षा सिंह या दोघांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले. त्यामुळे मग वयाचा निकष लावून शोएबला एआयआर १ तर आकांक्षाला एआयआर - २ देण्यात आला. शोएबचा पर्सेंटाइल स्कोर ९९.९९९९८५३७ आहे. एकूण १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैका १३.०८ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व प्रवर्गांचे मिळून एकूण ७ लाख ७१ हजार ५०० विद्यार्थी पात्र ठरले. मागील वर्षी ही संख्या ७ लाख ९७ हजार ४२ होती. यावर्षी कट ऑफ गुण वाढल्याने पात्र विद्यार्थ्यांची संख्या २५,५४२ ने कमी झाली. एकूण रिक्त जागांच्या पाच पट विद्यार्थ्यांना एनटीएने समुपदेशनासाठी पात्र घोषित केले आहे. नीटच्या ऑल इंडिया मेरिट यादीनुसार देशातील सर्व मेडिकल कॉलेजांमध्ये १५ टक्के जागांवरील प्रवेशांसाठी आता समुपदेशन प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर विविध राज्यांमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उर्वरित ८५ टक्के जागा स्टेट कोटा रँकच्या आधारे भरल्या जातील. नीट परीक्षेत एकूण ७२० गुणांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमधून एकूण १८० प्रश्न विचारण्यात आले होते. ही ऑफलाइन परीक्षा १३ सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. एकूण ११ विविध प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. ५२९ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १.५६ लाख जागा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियानुसार, यावर्षी देशातील ५२९ शासकीय, बिगर शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएससाठी ७५ हजार हून अधिक आणि बीडीएससाठी २६,९४९, आयुषच्या ५२,७२०, एम्सच्या १२०५, जिपमरच्या २०० आणि बीवीएसच्या ५२५ रिक्त जागांसह एकूण १ लाख ५६ हजार ५५९ जागांवर ऑल इंडिया रँक आणि स्टेट रँकनुसार प्रवेश होतील. सर्वसाधारण प्रवर्गाची कट ऑफ वाढली; आरक्षित प्रवर्गांतील घटली नीट २०२० मध्ये सर्वसाधारण प्रवर्गाची कट ऑफ मागील वर्षी १३४ होती, यावर्षी ती १४७ आहे. म्हणजेच कट ऑफमध्ये १३ गुणांची वाढ झाली आहे. ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील कट ऑफ मागील वर्षी १२० होती, यावर्षी ११३ आहे. म्हणजेच आरक्षित प्रवर्गाती कट ऑफ ७ गुणांनी घटली आहे. प्रवर्गनिहाय कटऑफ स्कोर सामान्य वर्ग- ७२०- १४७ ओबीसी, एससी,एसटी- १४६-११३ दिव्यांग सामान्य- १४६- १२९ दिव्यांग आरक्षित -१२८- ११३
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31g4j0x
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments