Also visit www.atgnews.com
व्हॉट्स अॅपच्या मदतीने मास कॉपी! २८ मोबाइल जप्त
तिरुवनंतपुरम: ऑनलाइन शिक्षण आणि ऑनलाइन परीक्षा पद्धतीमुळे लॉकडाऊन काळात शिक्षण सुसह्य झालं, मात्र याच तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉपीसारखे गैरप्रकारही होत आहेत. केरळमध्ये असाच एक मास कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे. व्हॉट्स अॅपच्या मदतीने विद्यार्थ्यांनी मास कॉपी केली. एक-दोन नव्हे, तर तब्बर २८ मोबाइल फोन या प्रकरणात पोलिसांनी जप्त केले आहे. चार इंजिनीअरिंग कॉलेजमधील विद्यार्थी २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या परीक्षेत कॉपी करताना आढळले. यापैकी १६ एकाच महाविद्यालयातील तर तर १० अन्य महाविद्यालयातील आणि दोन अन्य दोन कॉलेजातील आहेत. केरळ टेक्नॉलॉजिकल यूनिव्हर्सिटीच्या महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू होत्या. परीक्षा हॉलमध्ये मोबाइल सोबत बाळगण्यास बंदीच होती. या विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांसमोर वेगळे मोबाइल जमा केले आणि आणखी मोबाइल सोबत ठेवल होते. विद्यापीठाच्या नियमांनुसार परीक्षा हॉलमध्ये एखादा विद्यार्थी बेकायदा मोबाइल बाळगताना दिसला तर त्याला त्या परीक्षेत त्याला पुढची तीन वर्षे ती परीक्षा देण्याची परवागी नसते, त्याचा मोबाईलदेखील जप्त करण्यात येतो. या मुलांचे मोबाइल जप्त केल्यावर एकाच पेपरसंबंधी अनेक व्हॉट्स अॅप ग्रुप होते. काही ग्रुप्सवर तर ७५ मार्कांच्या प्रश्नांची उत्तरे शेअर केली होती. जप्त केलेले अनेक मोबाइल फोन आता लॉक्ड आहेत. हे फोन ब्लॉक करता येऊ शकतात आणि व्हॉट्स अॅप ड्युप्लिकेट सिम कार्डाच्या सहाय्याने रिमुव्ह देखील करता येऊ शकते. म्हणूनच चार कॉलेजांच्या प्राचार्यांनी सूचना केली आहे की मोबाईन फोन रि-चेक करून आणखी माहिती गोळा करण्याला मर्यादा आहेत. शिवाय असेच गैरप्रकार अन्य महाविद्यालयांमध्ये झाले का तेही पाहायला हवे. या चारही महाविद्यालयांच्या प्राचार्यांना समिती स्थापन करून पाच दिवसाच्या आत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mq76wd
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments