Also visit www.atgnews.com
नोव्हेंबरमधील दोन एमपीएससी पूर्व परीक्षा लांबणीवर
Exams Postponed: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या आणखी दोन महत्त्वाच्या परीक्षाही लांबणीवर टाकल्या आहेत. अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर २०२० रोजी होणार होती, तर दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर २०२० रोजी होणार होती. यासंदर्भातील परिपत्रक लोकसेवा आयोगाने आज मंगळवारी १३ ऑक्टोबर रोजी जाहीर केले आहे. या परीक्षाच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असे आयोगाने नमूद केले आहे. यापूर्वी नुकतीच रविवारी ११ ऑक्टोबर रोजी होणार असलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षणासंबंधी निकाल प्रलंबित असल्याने एमपीएससी परीक्षा तूर्त आयोजित करू नयेत, यासाठी मराठा संघटनांनी आंदोलन केले होते. कोविड-१९ परिस्थितीत यूपीएससी परीक्षांनाही फार प्रतिसाद दिला नव्हता, त्यामुळे एमपीएससी परीक्षा देखील सध्या आयोजित करू नयेत, अशी मागणी होत होती. 'मराठा आरक्षण प्रकरणी वेळ पडल्यास आपण तलवारही उपसू शकतो,' असा इशारा खासदार संभाजीराजेंनी दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली आणि त्यात रविवारी होणारी एमपीएससी परीक्षा तूर्त लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि आता नोव्हेंबर मधील परीक्षाही लांबणीवर टाकत असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलं.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33T8W2e
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments