Also visit www.atgnews.com
पोस्टात मोठी भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी संधी
भारतीय टपाल खात्याद्वारे महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये मोठी भरती केली जाणार आहे. पोस्टमन, मल्टी टास्किंग स्टाफ आणि मेल गार्ड पदांसाठी ही भरती होत आहे. सोमवार ५ ऑक्टोबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातील नोटिफिकेशन निघाले आहे. इच्छुक उमेदवराल ५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करू शकतात. कोणती पदे, किती पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा आदी सर्व इत्यंभूत माहिती या वृत्तात देत आहोत. शिवाय नोटिफिकेशनची लिंकदेखील अखेरीस देण्यात येत आहे. कोणती आणि किती पदे? पोस्टमन (PM) - १,०२९ पदे मेल गार्ड (MG) - १५ पदे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) - ३२ पदे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (सबऑर्डिनेट ऑफिसर) - २९५ पदे एकूण पदे - १,३७१ वयोमर्यादा पोस्टमन आणि मेल गार्ड पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. मल्टी टास्किंग स्टाफच्या रिक्त पदांसाठी वयोमर्याता १८ ते २५ वर्षे आहे. SC/ST/PWD प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत आहे. याबाबतची अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध आहे. शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण. - मराठी भाषेचे ज्ञान, किमान दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून हवे. - संगणकाचे ज्ञान आवश्यक. पेपर ३ हा संगणकावर डेटा एन्ट्रीचे कौशल्य पाहणारा पेपर असेल, तो पात्र असणे आवश्यक. - पोस्टमन पदांसाठी दुचाकीचा वाहन परवाना आवश्यक. परवाना नसल्यास दोन वर्षे मुदतीत तो मिळवण्याची अट. दिव्यांगांना सवलत. निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे होणार आहे. २०० गुणांची ऑनलाइन टेस्ट असणार आहे. पेपर १ हा १०० गुणांचा तर पेपर २ आणि ३ अनुक्रमे ६० आणि ४० गुणांचे असतील. पेपर १ साठी ९० मिनिटांचा कालावधी, पेपर २ साठी ४५ मिनिटे आणि पेपर ३ साठी २० मिनिटे कालावधीची परीक्षा असले. पेपर ३ ही संगणक आधारित टेस्ट असेल. सिलॅबसबाबतची माहिती नोटिफिकेशनमध्ये सविस्तरपणे देण्यात आली आहे. (पान क्र. ११ ते १३). उमेदवारांनी अर्ज भरतानाच परीक्षा केंद्राचा कोडही नमूद करायचा आहे. राज्यात एकूण २५ परीक्षा केंद्रे असून त्यांचे कोड नोटिफिकेशनमध्ये (पान क्र. २४) देण्यात आले आहेत. अर्ज कसा करायचा? इच्छुक उमेदवारांनी httos://doomah20.onlineaBplicationform.oro/MHPOST/ या रजिस्ट्रेशन पोर्टलवर अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया ५ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. शुल्क शुल्क ऑनलाइन भरायचे आहे. प्रति पोस्ट १०० रुपये ऑनलाइन अर्जासाठी आणि ४०० रुपये परीक्षा शुल्क असे एकूण ५०० रुपये शुल्क आहे. आरक्षित प्रवर्ग आणि महिलांसाठी परीक्षा शुल्क माफ आहे. वेतन श्रेणी पोस्टमन / मेल गार्ड - वेतनश्रेणी - ३ (२१,७०० ते ६९,१०० रुपये.) मल्टी टास्किंग स्टाफ - वेतनश्रेणी - १ (१८,००० ते ५६,९००)
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jsanKC
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments