सीईटी हुकली? पुन्हा मिळणार संधी

म. टा. प्रतिनिधी, पुणे अतिवृष्टीसारख्या कारणांनी एमएचटी-सीईटी परीक्षा देण्यासाठी मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विशेष सत्रात देण्याची संधी मिळणार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी ट्विट करुन माहिती दिली आहे. दरम्यान, देण्यापासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची एक संधी मिळावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली होती. राज्याती 'पीसीबी' गटाची परीक्षा १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत पार पडली. तर, 'पीसीएम' गटाची परीक्षा १२ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.सीईटीचे परीक्षा केंद्र प्रामुख्याने शहरी भागात होते. त्याचप्रमाणे शहरी भागात संसर्ग अधिक असल्याने अनेक विद्यार्थी सीईटीपासून वंचित राहिले. या अनुपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेची एक संधी देण्यात यावी. सध्या सुरू असणाऱ्या पीसीएम गटाच्या सीईटी परीक्षेसाठी काही विद्यार्थी आधार कार्ड नसणे, मूळ प्रतित ओळखपत्र नसणे, परीक्षा केंद्रावर काही मिनिटांनी उशिरा पोहोचणे अशा कारणांमुळे उशिरा पोहोचत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी आत सोडले जात नाही. परिणामी या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागत आल्याची तक्रार पालकांनी केली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना सीईटी देण्याची एक संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या गुणांची पात्रता कमी केल्याने, बारावीत कमी गुण असलेले अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मात्र, सीईटीपूर्वी हे विद्यार्थी पूर्वीच्या निकषाप्रमाणे अपात्र असल्याने सीईटीला अनुपस्थित राहिले. नव्या निकषानुसार पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीसाठी संधी द्यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट्स इन रुरल एरिया या संस्थेद्वारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. त्यानुसार एमएचटी सीईटीच्या पीसीबी आणि पीसीएम गटाच्या परीक्षेला अतिवृष्टीसारख्या कारणांनी मुकलेल्या परीक्षा देण्यासाठी एक संधी दिली जाईल. या विद्यार्थ्यांची विशेष सत्रात परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग प्रवेशाची संधी मिळणार आहे. चौकट नीट परीक्षेला विविध कारणांमुळे उपस्थित राहता न आलेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पुन्हा संधी दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून ( सीईटी सेल) सीईटी परीक्षेसाठी एक संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचप्रमाणे १२ ऑक्टोबरला मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे, दुपारच्या सत्रातील काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांनी सीईटी सेलशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kgtt6M
via IFTTT

Post a Comment

0 Comments